UDISE PLUS प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची सन 2025-26 मधुन 2026-27 या वर्षात वर्गवाढ केली का ? नसेल केली तर खालील सुचना प्रमाणे कार्यवाही करा.

 

Student promotion in UDISE PLUS 2026-27

Udise plus प्रणालीमध्ये Student Module मधील सन 2025-26 या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना सन 2026-27 या वर्षात प्रमोट (वर्गवाढ) करण्यासाठी शाळा लॉगिन ला Tab उपलब्ध झालेला आहे. तरी सर्व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली च्या वर्गातुन 2 च्या वर्गात, दुसरीच्या वर्गातुन 3 च्या वर्गात या प्रमाणे वर्गवाढ करावयाची आहे. त्यासाठी मुख्याध्यापक Login वर सर्व विद्यार्थ्यांना सन 2026-27 या वर्षात प्रमोट करण्यासाठी Progression Activity चा Tab उपलब्ध आहे.

 


विद्यार्थी प्रमोशन करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करा.

  • विद्यार्थी प्रमोशन करतांना Udise plus – Student Module मध्ये Academic Year 2026-27 घ्यावे. नंतर Student Movement and Progression मध्ये Progression Activity ला क्लिक करावे. नंतर Progression Summary Section Wise या Tab वर क्लिक करुन शाळेतील एक इयत्ता व तुकडी निवडून इयत्तानिहाय विद्यार्थी प्रमोट करावेत.
  • Progression Status मध्ये परीक्षा देऊन पुढच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी - Pramoted (by Examination), तर पास न झालेल्या / पुनर्रप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी -  Not Pramoted / Repeter, तर परीक्षा न देता पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी - Pramoted without Examination यापैकी योग्य पर्याय निवडावा.
  • विद्यार्थी प्रमोट करतांना Marks in Percentage (%) 2025-26 या Tab मध्ये विद्यार्थ्यांचे सन 2025-26 मधील गुण भरावेत., No. of Days School attended (2025-26) या Tab मध्ये विद्यार्थ्यांचे सन 2025-26 मधील  उपस्थित दिवस भरावेत.
  • विद्यार्थी सन 2026-27 या वर्षात सध्याच्याच शाळेत राहणार असल्यास Schooling Status (2026-27) या Tab मध्ये Studying in same School करावे. व विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार असल्यास Left School With TC / Withoud TC करावे. म्हणजे सदर विद्यार्थी दुसऱ्या शाळेस Import करता येईल.
  • वरिल प्रमाणे विद्यार्थ्यांची अचुक माहिती भरुन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नावासमोरील Update बटणावर Click करावे. त्यानंतर एका तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर Page च्या खाली दिलेल्या Finalize बटणावर Click करावे. तसेच सदर माहिती दुरुस्ती असल्यास Update बटणाच्या खाली असलेल्या Correction या बटणावर Click करुन माहिती दुरुस्ती करता येईल.
  • शाळेतील सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांची माहिती भरुन झाल्यानंतर Student Movement and Progression मध्ये Finalize Progression ला क्लिक करुन Submit या बटणावर Click करावे. 

 

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेवसाईट म्हणुन मानु नका. आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल व्केरी किंवा या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद.

Previous Post Next Post