इ 1 ली व पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी मोफत 25% प्रवेश | RTE Free 25% Admitions
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये (RTE - Right to Education) खाजगी विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास घटकातील बालकांना इयत्ता 1 ली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग स्तरावर मोफत 25% प्रवेश मोफत दिले जातात. यासाठी पालकांना प्रवेश प्रक्रीया सुरु झाल्यानंतर https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावर जाऊन मुदतीत परिपूर्ण अर्ज भरण्याची कार्यवाही करावी लागते.
प्रवेशासाठी पात्रता – सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), किंवा इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (अ) , भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) व विशेष मागासवर्ग (एस.बी.सी.) विद्यार्थ्यांसाठी पालकांचा जातीचा दाखला आवश्यक आहे. तसेच वंचित घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबधित बालकांचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, अनाथ बालके असल्यास अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालय / बाल सुधारगृहाची कागदपत्र ग्राहय धरण्यात येतात , घटस्फोटीत महिला पालक असल्यास न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटीत महिलेचा रहिवाशी पुरावा, एच.आय.व्ही. बाधित असल्यास जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे प्रमाणपत्र इत्यादी.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -
- प्रवेश घ्यावयाचा आहे त्या मुलाचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
- वडिलांचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदारांचा अधिकृत दाखला)
- रहिवासी पुरावा (उदा. रेशन कार्ड, आधार कार्ड, वीज बिल किंवा भाडेकरू करारनामा)
- जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- मुलाचे व पालकांचे आधार कार्ड
सर्वसाधारण सुचना -
- ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पाकलांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो.
- पालकांनी अर्ज करतांना घराचा पत्ता, बालकाचा जन्मदिनांक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दिव्यांगाचे प्रमाण्पत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी माहिती अचुक भरावी.
- पालकांनीअर्ज भरतांनी खालील कागदपत्रे अपलोड करावेत. - बालकांच्या पालकांचे, आई किंवा वडीलांचे आधारकार्ड (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड) अपलोड करावे. / बालकाचे जन्म प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा / भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा प्रत / पालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र (लागु असल्यास)
- निवासी पुरावा म्हणुन रेशन कार्ड , ड्रायव्हिग लायसन्स, वीज देयक, टेलिफोन बील, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरण्यांत येतो.
- ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन सोडत (लॉटरी) व्दारे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली जाते. तसेच उपलब्ध जागाएवढी प्रतिक्षा यादी तयार केली जाते.
- निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी पडताळणी समितीकडे सादर केल्यानंतर पडताळणी समिती कागदपत्राची पडताळणी करुन विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करते.
