Student Import In Udise Plus

 

Student Import in UDISE PLUS : UDISE PLUS प्रणालीमध्ये इ. 2 री ते 12 वी मध्ये शाळेत नविन आलेल्या विद्यार्थ्यांना Import करण्यासाठी महत्वाची माहिती

UDISE PLUS प्रणालीमध्ये Student Module मधील सन 2025-26 या वर्षातील विद्यार्थ्यांना सन 2026-27 या वर्षात प्रमोट (वर्गवाढ) प्रमोट केलेले आहे. तरी सध्याच्या शाळेतुन दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना Left With with TC / Without TC केलेले विद्यार्थी Import करण्यासाठी Dropbox मध्ये उपलब्ध असतात. तरी सन 2026-27 मध्ये इ. 2 री ते 12 वी मधील शाळेत नविन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत Import करण्यासाठी UDISE PLUS - Student Module वर Tab उपलब्ध आहे.


Student Import In Udise Plus


Dropbox मधील विद्यार्थी Import करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करा.

    विद्यार्थी Import करण्यासाठी UDISE PLUS – STUDENT MODULE मध्ये Academic Year 2026-27 घ्यावे. नंतर Student Movement and Progression मध्ये Import Module ला क्लिक करावे. त्यानंतर तालुक्यातील, जिल्हयातील किंवा महाराष्ट्र राज्यातील शाळेतुन आलेल्या विद्यार्थ्यांना Import करण्यासाठी Import – Within State या Tab चा वापर करावा तर परराज्यातुन किंवा केंद्रिय विद्यालयातुन आलेल्या विद्यार्थ्यांना Import करण्यासाठी Import – Outside State या Tab चा वापर करावा.

    विद्यार्थी Import करतांना Import या Tab च्या खाली असलेल्या Go बटणावर क्लिक करावे. दुसऱ्या  राज्यातील विद्यार्थी असेल तर त्याठिकाणी State निवडावे. नंतर Student PEN या ठिकाणी विद्यार्थ्यांचा PEN क्रमांक भरावा व Date of Birth या ठिकाणी विद्यार्थ्यांची जन्मतारीख भरुन Go बटणावर क्लिक करावे.

    यानंतर सदर विद्यार्थ्यांचे नांव, इयत्ता, शाळेचे नांव इत्यादी माहिती दिसेल व त्याठिकाणी Import To (2026-27) या ठिकाणी Import Class मध्ये विद्यार्थ्यांला ज्या इयत्तेत दाखल केले आहे ती इयत्ता Select करावी, Import Section मध्ये विद्यार्थ्यांला ज्या तुकडीत दाखल केले आहे ती  तुकडी (Division) Select करावी तर Date of Admission  या Tab मध्ये विद्यार्थ्यांला शाळेत दाखल केलेली तारीख भरुन Import बटणावर क्लिक केल्यानंतर सदर विद्यार्थी शाळेत Import होईल.

 

कोणते विद्यार्थी Import करता येतील?

 
  • शाळेमध्ये विद्यार्थी Import करतांना फक्त Dropbox मध्ये असलेले विद्यार्थीच Import करता येतील. ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये Current Schooling Details समोर DROPBOX असे असेल तरच विद्यार्थी Import करता येईल.
  •  ज्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये Current Schooling Details समोर INACTIVE असेल तर संबधित मुख्याध्यापक, Block MIS किंवा District MIS यांना संपर्क करुन सदर विद्यार्थी ACTIVE करण्यांबाबत विनंती करावी. त्यानंतर सदर विद्यार्थी Import करण्यासाठी Dropbox मध्ये दिसतील.
  •  संबधित मुख्याध्यापक यांना संपर्क करण्यासाठी School Contact and Location Details ला क्लिक केल्यानंतर संबधित मुख्याध्यापक यांचे नांव व संपर्क क्रमांक दिसेल व त्याखाली View MIS Details या Tab ला क्लिक केल्यानंतर संबधित Block MIS, District MIS यांचे नांव व संपर्क  क्रमांक उपलब्ध होईल.
  •  Dropbox मध्ये नसलेल्या विद्यार्थ्यांना Import करण्यासाठी UDISE PLUS – STUDENT MODULE मधील Student Release Request Management या Tab चा वापर करुन संबधित शाळेस Student Request पाठवावी लागेल. त्यानंतर संबधित शाळा खात्री करुन सदर Request Approve किंवा Reject करेल.



Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेवसाईट म्हणुन मानु नका. आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबधित तक्रारी, योजनेबद्दल व्केरी किंवा या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद.

Previous Post Next Post